बनावट नोटा प्रकरणी तिघांना अटक केली.  pudhari news network
जळगाव

जळगाव : बनावट नोटा प्रकरणी चौथ्या आरोपीला शोधसाठी पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ मध्ये नाहाटा कॉलेज चौफुलीजवळ संशयितांना तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणून बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी चौथ्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यासाठी दोन पथके मध्य प्रदेशात रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांना तीन संशयित आरोपी तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन येत असल्याच्या माहितीवरून या संशयितांना बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात सादर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरणी चौथ्या आरोपीला देखील अटक करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांचे दोन पदके मध्यप्रदेशात रवाना झालेले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बनावट नोटांप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते. या नोटा कुठे छापल्या जातात याचा तपास सुरू आहे. यामध्ये अजून बनावट नोटा असण्याची शक्यता असून त्या सर्व नोटा जप्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे . यामध्ये एक नामांकित राजकीय व्यक्ती व मध्य प्रदेशातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेला व्यक्तीच्या नावांची देखील चर्चा सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT