Jalgaon | जिल्ह्यात नकली नोटा आल्या कुठून ?

रावेर - जळगाव व भुसावळ नेमके कनेक्शन काय?
Jalgaon
file photo
Published on
Updated on

जळगांव : भुसावळ शहरात बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना बुधवारी दि. 4 बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यामुळे रावेर त्यानंतर जळगाव व भुसावळ ट्रँगल मध्ये नेमके कनेक्शन काय आहे? या नोटा आल्या कुठून? याचे हँडलर भुसावळमध्ये आहे का? की रावेर जळगाव मध्ये असा प्रश्न पडला असून याचा शोध घेण्याची गरज पोलिसांना आहे. भुसावळ रेल्वेचे जंक्शन आहे व येथे येण्यासाठी अनेक मार्ग आहे, त्यामुळे भुसावळही गुन्हेगारांच्या दृष्टीने सोयीचे बनले आहे. या नोटा नेमकं कोण विकत घेणार होतं हा शोध लावणं महत्वाचं आहे.

भुसावळ शहर हे पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील शहर आहे. या शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतात. सरकारी सामानाची चोरी असो, सट्टा पत्ता, गांजा, एमडी यासारखे व्यवसाय या ठिकाणी सुरू असतात. काही वेळेस संशयितांना पकडण्यात यश येते तर काही वेळेस पोलिसांना अपयशी येते.

नकली नोटांचा व्यवसाय करण्यासाठी भुसावळ शहर हे सर्वात महत्त्वाचे शहर गुन्हेगारांच्या दृष्टीने म्हटले जाईल. कारण या शहरातून मुंबई पुणे नाशिक नागपूर व देशातील इतर राज्यात जाण्यासाठी सोयीचा असा रेल्वे मार्ग उपलब्ध आहे व रेल्वे स्टेशनवर पाहिजे तशी सुरक्षा व्यवस्था असूनही नसल्यासारखी आहे.

दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे थेट कुठेही न थांबता माणूस चिखली बुलढाणा अकोला मार्गे राज्यातील उपराजधानी किंवा मुंबई किंवा औरंगाबाद शहरात काही काळातच पोचू शकतो. त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तर तो नकली नोटा घेणारा कोण जो की एक लाख रुपये देऊन तीन लाख रुपयाच्या नकली नोटा घेणार होता. यांचा व्यवहार कोणाशी होणार होता तो व्यक्ती कोण आहे. तो मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तीनही ज्या मोटरसायकलवर एकत्रित आले होते व इथे कोणाला ते पैसे देणार होते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार यामधील एक आरोपी हा माजी नगरसेवक किंवा राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईक असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. तर रात्री आरोपींना खाण्यासाठी बटर खिचडीची ऑर्डर देण्याची चर्चा सध्या बाजार पेठमध्ये रंगली आहे. आणणारे आरोपींचे नातेवाईक होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमध्ये या नोटा छापण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news