जळगाव

Jalgaon | वाळू वाहतूक परवाना देण्याच्या मोबदल्यात लाच मागणारा तलाठी जाळ्यात

गणेश सोनवणे

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विटनेर येथे एका तक्रारदाराला पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर झाले होते. घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली वाळू वाहतूक करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी तलाठी यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने या कृत्याची तक्रार जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार सापळा रचला असता दि. 28 रोजी जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्यास लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार यांच्या सासर्‍याला चोपडा तालुक्यातील विटनेर येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. हे घरकुल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता होती. यासाठी तलाठी रविंद्र काशिनाथ पाटील , (वय 50) यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंबधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर सापळा रचला असता तलाठी रविंद्र काशिनाथ पाटील यांना रंगेहाथ पकडले.

पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर यांनी सापळा रचून ही कारवाई केली.  याप्रकरणी डीवायएसपी सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीपोनि एन.एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,
पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ.राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT