जळगाव

जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अनुदानित आश्रमशाळा सत्रासेन तालुका चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सदर क्रीडा स्पर्धेसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून १७ शासकीय व ३२ अनुदानित आश्रमशाळेतील एकूण ६८१ मुले व ५३१‌ मुली असे एकूण १२१२ स्पर्धक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.

या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिनांक २९ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत यावल, चोपडा, चाळीसगाव, अमळनेर या चारही बीट मधील सर्व सांघिक साखळी सामने पार पडले. खो-खो, कबड्डी, हँडबॉल, हॉलीबॉल, रिले या खेळ प्रकारांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात वयवर्ष १४, १७, १९ वयोगटातील मुली तसेच दुपारच्या सत्रात मुलांच्या धावणे (१०० मीटर २०० मीटर ४०० मीटर ६०० मीटर ८००मीटर १५०० मीटर, ३०००मीटर ) तसेच फेकी (गोळा)थाळी व भाला) स्पर्धा घेण्यात आल्या.

दिनांक ३१ रोजी सर्व सांघिक स्पर्धांचे अंतिम सामने पार पडले. यात सर्वसाधारण जेतेपद प्रथम क्रमांक चोपडा बीट, द्वितीय चाळीसगाव, तृतीय यावल व चौथा अमळनेर बीट यांनी पटकावला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भ्रमणध्वनी द्वारे मुलांना मार्गदर्शन केले. नाशिक अप्पर आयुक्त संदीपजी गोलाईत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे रवींद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव, निलय राठोड जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धुळे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्पाधिकारी यावल अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. नाशिक येथील अपर आयुक्त संदीप गोलाईत म्हणाले की, क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंनी आपआपले नावलौकिक करावे. शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा. देशसेवेकडे कल असणाऱ्यांनी यातून धडे घ्यावेत असे प्रतिपादित केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT