Monsoon in Jalgaon
जळगाव: जळगाव जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अद्यापही पेरण्या रखडलेल्या आहेत. जून महिन्यात तेरा दिवसांमध्ये 88.6 मिलिमीटर तर 71.6 टक्के मि.मी पावसाची नोंद झालेली आहे. तर आज (दि. 26) 9.8 मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.
जिल्ह्यामधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव बोदवड मध्ये जून महिन्याच्या 26 दिवसांच्या कालावधीमध्ये तेरा दिवस पावसाने हजेरी लावलेली आहे. एकूण 88.6 मिलिमीटर व 71.6 टक्के पावसाची नोंद तेरा दिवसांमध्ये झालेली आहे.
सर्वाधिक पाऊस भुसावळ 13 दिवस, जळगाव 12 दिवस, पारोळा धरणगाव या ठिकाणी दहा दिवस, बोदवड, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, एरंडोल या ठिकाणी नऊ दिवस चोपडा भडगाव याठिकाणी आठ दिवस , यावल सात दिवस, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर या ठिकाणी सहा दिवस पावसाची नोंद झालेली आहे.
जळगाव - 4.5 मिमी, एकूण 118 मि .मी, 87.2 टक्के, 12 दिवस
भुसावळ - 3.7मिमी, एकूण 155.6मि.मी, 128.7 टक्के,13 दिवस
यावल - 1.1मि मी, एकूण 51.9 मि मी, 40.8 टक्के, 7 दिवस
रावेर - 0.4 मिमी, एकूण 38.9 मि.मी, 31 टक्के, 6 दिवस
मुक्ताईनगर - 0.3 मिमी, एकूण 76.1 मि.मी, 74.3 टक्के, 6 दिवस
अमळनेर - 0.8 मिमी, एकूण 50.7 मि.मी., 44.2 टक्के, 6 दिवस
चोपडा - 10.6 मिमी, एकूण 82.2 मि.मी., 64.4 टक्के, 8 दिवस
एरंडोल - 9.1 मिमी, एकूण 119.5 मि.मी., 98.8 टक्के, 9 दिवस
पारोळा - 19.9 मिमी, एकूण 123.2 मि.मी., 100.2 टक्के, 10 दिवस
चाळीसगाव - 25.4 मिमी, एकूण 92.9 मि.मी., 72 टक्के, 9 दिवस
जामनेर - 6.2 मिमी, एकूण 95.2 मि.मी. , 69.1 टक्के, 9 दिवस
पाचोरा - 27.9 मिमी, एकूण 121.2 मि.मी. , 104.7 टक्के,9 दिवस
भडगाव - 27.3 मिमी, एकूण 99.7 मि.मी. , 78.2 टक्के,8 दिवस
धरणगाव - 4.5मिमी , एकूण 68.8 मि.मी. , 49.1 टक्के,10 दिवस
बोदवड - 0.8 मिमी, एकूण 93.9 मि.मी. , 75.8 टक्के,9 दिवस