

जळगाव : ‘योग आणि आहार’ या विषयाच्या अनुषंगाने ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जैन फार्मफ्रेश फूड्स लि. आणि इतर संबंधित आस्थापनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैलीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत सहकाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांची नेहमीच ही भावना होती की, “माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचे आरोग्य सुदृढ असावे.” त्यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत अध्यक्ष अशोक जैन यांनीही सहकाऱ्यांच्या आरोग्याकडे सदैव लक्ष दिले आहे.
जैन हिल्स येथील जैन फूड पार्कच्या स्पाईस रिसीविंग विभागात आयोजित योग दिन कार्यक्रमात जैन अॅग्री पार्क, फूड पार्क, स्पाईस विभाग, टिश्यू कल्चर लॅबमधील १४०० पेक्षा अधिक सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
योग शिक्षिका कमलेश शर्मा यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. प.पू. डॉ. इनितप्रभाजी महाराज यांनी योगाच्या मानसिक व शारीरिक फायद्यांविषयी मार्गदर्शन करून मंगल आशीर्वाद दिले. ‘जैन भूमिपुत्र’चे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. मोनिका भावसार यांनी ‘आहार, आरोग्य आणि जीवनशैली’ यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानवसंसाधन विभागाचे जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, भिकेश जोशी, वैभव चौधरी, सुचेत जैन, आर. डी. पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुभाष जाखेटे (सूर्यगिरीजी) यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार मंत्राने सुरुवात झाली आणि तितली आसन, भ्रामरी प्राणायाम, वज्रासन आदी योगसत्रे पार पडली. सी. एस. नाईक यांनी स्वागत केले, तर किशोर बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश पाटील, अनिल जैन यांच्यासह कार्मिक विभागाने कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
हायटेक प्लॉट फॅक्टरी, टिश्यू कल्चर पार्क, टाकरखेडा येथे महिलांसाठी विशेष योगसत्र घेण्यात आले. योग शिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी महिलांना योग्य आसने करून घेतली व बैठे कामांमुळे होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय सांगितले. डॉ. कल्याणी मोहरीर व विजयसिंग पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. बी. ठाकरे, मनोहर पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. अश्विनी पाटील, प्रवीण पगारिया, प्रशांत चौधरी आदींनी मेहनत घेतली.
अनुभूती निवासी शाळेत सकाळी ६ ते ७ दरम्यान योगसत्र पार पडले. डॉ. स्नेहल फेगडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले आणि योग व एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगितले. योगमंत्राने सुरुवात करून विविध योगक्रिया विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या.