Police Pudhari
जळगाव

Operation Muskan: ‘ऑपरेशन मुस्कान’ मध्ये पोलिसांचा धडाका! मध्यरात्री मुक्ताईनगरमध्ये धडक कारवाई; १५ जण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर कडक जरब बसवण्यासाठी जळगाव पोलीस दलाने शनिवार, ०८ रोजी मध्यरात्री मुक्ताईनगर तालुक्यात धडक कोंबींग ऑपरेशन राबवले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या या विशेष मोहिमेत गुन्ह्यातील दोन फरार आरोपींसह एकूण १५ संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मध्यरात्री तीन गावांत 'कॉम्बिंग'

मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी, लालगोटा व हलखेडा या तीन गावांना मध्यरात्री पोलिसांनी वेढा दिला.

उद्देश: चोरी, दरोडा, घरफोडी यांसारख्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे आणि गुन्हेगारांना सक्रिय होण्यापूर्वीच पकडणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता.

या संयुक्त कारवाईदरम्यान, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (वय ४५, रा. मधापुरी) आणि दिपमाला कमलेश पाटील (वय ३८, रा. मधापुरी)या दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली. व रेकॉर्डवर' असलेल्या १३ जणांवर प्रतिबंधक कारवाई

अटकेच्या कारवाईसोबतच, पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पूर्वी चोरी/दरोड्यासारख्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या १३ इसमांवर प्रतिबंधक कारवाईची (भा. ना. सु. संहिता कलम १२८ व १२९) कठोर कार्यवाही केली आहे. यामध्ये मधापुरी येथील ६, लालगोटा येथील ६ आणि हलखेडा येथील १ अशा एकूण १३ जणांचा समावेश आहे.

प्रतिबंधक कारवाई केलेल्यांमध्ये मुख्यतः पवार आणि भोसले समाजातील व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांचे वास्तव्य मधापुरी, लालगोटा आणि हलखेडा या तीन गावांमध्ये आहे. जिल्हा पोलीस दलाची ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध होती. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यासह विविध उपविभाग आणि पोलीस मुख्यालयाकडील ०१ पोलीस निरीक्षक, ०४ सहायक/उपनिरीक्षक आणि १३० पोलीस अंमलदार असे मोठे मनुष्यबळ वापरण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने ०४ आर.सी.पी. पथके देखील सहभागी होती.

यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक . डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक . अशोक नखाते, आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी . सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT