

Manvat leaders join NCP
मानवत : युवा नेते डॉ. अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तब्बल 22 नेते आणि प्रभावशाली कार्यकर्त्यांनी परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राणी अंकुश लाड यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यात शहरातील प्रकाश पोरवाल, गिरीश कत्रुवार, बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, मोहन लाड, संजय बांगड, डॉ. राजेश्वर दहे, अँड. किरण बारहाते, राजू खरात, राजेश वासुंबे, कविता धबडगे, अभिषेक अळसपुरे, किशोर लाड, दत्ता चौधरी, विनोद राहाटे, बाजीराव हळनोर, नियामत खान, अ. रहीम अ. करीम, सय्यद जमील, स्वप्निल शिंदे आणि गणेश उगले यांचा समावेश आहे. तसेच सदरील निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा स्वबळावर लढणार असल्याचे समजते.