file photo 
जळगाव

Jalgaon News : फुलगाव फाट्याजवळ दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरूण ठार

गणेश सोनवणे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या फुलगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झाली. रात्री उशीरा झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास फुलगाव फाट्याजवळ दोन मोटारसायकल एकमेकांना समोरा-समोर धडकल्या. यात दुचाकींवरील दोघे जणगंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या अपघातात विजय रामकृष्ण महाजन (वय ४७, रा. फुलगाव) आणि ललित दांडे (वय ३५ रा. वरणगाव) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होतानाच त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. फुलगाव फाट्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी कधीपासून होत असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दोन्ही मृतांच्या पार्थिवांचे आज शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT