जळगाव

Jalgaon News | युवासेना जळगावतर्फे राज्यशासनाचा निषेध

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगावतर्फे आमदार गायकवाड व राज्य शासना विराेधात निदर्शने करून जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी यांच्या नेतृत्वाखाली 17 मजली समोर आंदोलन करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, जिल्हा चिटणीस अंकित कासार, विधानसभा क्षेत्रयुवाधिकारी अमीत जगताप, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमहानगर प्रमुख हर्षल मुंडे, राहुल शिंदे, निलेश जोशी, तुषार पाटील, झैद पटेल, ओम कोळी, मयूर अण्णा गवळी, युवासैनिक राकेश थोरात, संदेश बोंडे, जयेश महाजन, राकेश कोळी, देव सपकाळे, अजिंक्य जैन, उज्वल राजपूत, पार्थ सावा, विभाग अधिकारी गौरव चंदनकर, युवती अधिकारी दिपाली बाविस्कर, सायली येवले यांसह युावसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT