जळगाव

Jalgaon News : लाचखोर ग्रंथपाल एसीबीच्या जाळ्यात ; शिक्षण क्षेत्रात खळबळ

गणेश सोनवणे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा , कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी ७ हजाराची लाच घेणारा श्रीकांत गुलाब पवार ग्रंथपाल (वय-३८) रा. माध्यमिक आश्रम शाळा करगाव ता.चाळीसगाव याला जळगाव लाचलुचपथ विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

संबधित बातम्या :

याबाबत अधिक असे की, तक्रारदार यांचे चाळीसगाव तालुक्यातील करगाव आश्रमशाळेत ४१ वर्षीय कर्मचारी यांच्यात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी जळगावच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी "फोन-पे" वर पवार यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर नाशिक येथील प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभागातून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार ५१९ रूपये १६ टक्क्याप्रमाणे १२ हजारांची लाच ग्रंथपाल श्रीकांत पवार यांनी मागितली. तडजोडअंती ७ सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच  पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, सापळा व तपास अधिकारी  पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांनी सापळा लावून आरोपीला रगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. सचिन चाटे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर यांनी मदत केली. दरम्यान, या लाचखोरीची पाळेमुळे ही खोलवर रूजली असून यात अन्य अधिकारी आणि कर्मचारी देखील सहभागी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT