जळगाव

जळगाव : टाळ मृदंग वाजवत राष्ट्रवादीचे महानगरपालिकेसमोर आंदोलन

गणेश सोनवणे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा; महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. आकाशवाणी चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवण्यात येत आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये प्रशासन कमी पडत असून या गरजा लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर तर्फे आज देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महानगरपालिकेसमोर सकाळी बारा वाजेला टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. महानगरपालिकेचा भर हा प्रशासनाकडे आहे.

शहरातील बहुसंख्य रस्ते हे खराब झाले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना पाठदुखी सारखे आजार होत आहेत. नवीन रस्ते तयार करण्यात महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे. महानगरपालिकेचा पदभार हा प्रशासनाकडे असल्यावर कोणत्याही सुधारणा होताना दिसून येत नाहीये, वर्षभरात काही भागांमध्ये डांबरी करण्याचा रस्ता डांबर व खडी करण्याचा फक्त एक एक थर टाकून मक्तेदार मोकळे झाले आहेत उर्वरित कामांकडे दुर्लक्ष करीत आहे.

शहरातील काही भागांमध्ये अमृत योजनेबाबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. परंतु अवेळी व अपुऱ्या दाबाने होत असल्याने नागरिकांना पुरेशी पाणी मिळत नाहीये. पथदिव्यांची दुर्दशा झाली आहे. मक्तेदाराने संपूर्ण शहरात दिवे लावलेले नाही. फक्त काही भागात दुरुस्त करण्यास नकार देत असल्याचे नागरिकांची ओरड आहे. शहरातील स्वच्छतेबाबत तीच परिस्थिती निर्माण झालीय. गटारी सार्वजनिक शौचालय स्वच्छ होत नाही कोणी मक्तेदार काम करत नाही तरी नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर तर्फे महानगरपालिकेत देण्यात आला. यावेळी अशोक लाळ वंजारी, मंगला पाटील, रिंकू चौधरी, रितेश पाटील, अमोल कोल्हे, सुनील माळी, वायस महाजन, रहीम तडवी, इब्राहिम तडवी, सुभाष चौधरी, नवीन खाटीक डॉक्टर रिजवान खाटीक, साबीर शहा, पंकज तनपुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT