

बारामती : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाचा वाढता वापर आता धोकादायक ठरू लागला आहे. बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांत दोघांचे व्हॉटसअॅप अकांउट हॅक केले गेले. त्याद्वारे विविध ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्यात आले. त्यामुळे मोबाईलधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सर्वाधिक सुरक्षित समजले जाणारे व्हॉट्सअॅपही आता हॅकर्सकडून सहजरीत्या हॅक केले जाऊ लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना अधिकची खबरदारी घेणे आता गरजेचे झाले आहे. अलीकडील काळात बारामती तालुक्यात सायबर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करतानाही सतर्क राहण्याची गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
व्हॉटसअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. व्हॉटसअॅपच्या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, चॅट, फाईल्स पाठवणे, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग सुविधा आहे. त्यामुळे त्याचे वापरकर्ते अधिक आहेत. परंतु कोर्हाळे बुद्रुक परिसरात दोघांचे अकाउंट हॅक केले गेले. त्यानंतर हे मोबाईलधारक ज्या ग्रुपमध्ये होते, तेथे अश्लील व्हिडीओ व फोटोचा मारा हॅकर्सकडून केला गेला.
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, वापरकर्त्याने व्हेरिफिकेशन कोड कोणाला तरी सांगितल्यावरच हे घडू शकते. आपले अकाउंट हॅक झाले तर तत्काळ खाते रिकव्हर करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
कशी होते फसवणूक