जळगाव

Vidhan Parishad Election Result | जळगावमध्ये 582 मतांनी महायुतीचे उमेदवार विजयी

जळगाव जिल्ह्यात महायुतीचे नंदकुमार महाजन 582 मतांनी विजयी झाले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 582 मते मिळाली. त्यांनी महाविकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून विजय नोंदविला. मात्र पाचोर्‍याचे किशोर आप्पा पाटील यांनी नाशिकच्या विजयावर मात्र आपला आक्षेप नोंदविला. आमच्या नेत्यांनी दिलेला शब्द जळगावमध्ये पडला, मात्र नाशिकमध्ये त्यांनी शब्द पडलेला नाही; अशी प्रतिक्रिया प्रतिनिधीशी बोलताना पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन अर्ज भरण्यापासून माघारीनंतरही अनेक घडामोडी झाल्या. अनेकांची मनधरणी करत शेवटी जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झाले. अनेक वर्षानंतर रावेर तालुक्यातील तांदलवाडी या ठिकाणी आमदारकी मिळाली.

विधान परिषदेच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. अधिकाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी निरीक्षक अशोक काकडे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे आरडीसी वैशाली चव्हाण निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रथम तीन टेबलांवर 6 मतपेट्या फोडण्यात आल्या. यामधील मतपत्रिकांचे कठीण केल्यानंतर सातवी पेटी फोडण्यात आली. मतमोजणीच्या ठिकाणी भाजपाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार नंदकुमार महाजन हे 8.50 तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे 8.55 ला उपस्थित झाले.

त्यानंतर वैध अवैध मतांची मोजणी करण्यात आली यामध्ये पाच मते अवैध ठरली. जळगाव जिल्ह्यातील 630 मतदारांपैकी 14 जणांनी मतदान केलेले नव्हते. त्यामुळे 616 मतांपैकी 306 मध्ये मिळवणाऱ्या विजयी ठरणार होता. यामध्ये मतमोजणी दहा वाजेपर्यंत पूर्ण झाली. यात महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना सतरा महायुतीचे नंदकुमार महाजन 582 अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 तर शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार व अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांना एक मत मिळाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे नंदकुमार महाजन 582 मतांनी विजयी झाले.

अल्पबचत भवनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर कडेकोट बंदोबस्तमध्ये पत्रकारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली होती. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत काय सुरू आहे याची सर्व माहिती अनाउन्समेंटनंतर मिळत होती. बंदोबस्तसाठी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री गणापुरे हे उपस्थित होते. विद्याच्या जल्लोषासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी ट्रक भरून गुलाल जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आणला होता. यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT