heatwave alert Pudhari File Photo
जळगाव

Jalgaon Temperature | जळगाव तापले! पारा ४२.८ अंशांवर; दुपारी शहरात कर्फ्यूसारखी परिस्थिती

किमान तापमानातही वाढ होऊन ते २६.२ अंशांवर स्थिरावल्याने रात्रीदेखील उकाडा कायम

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon 42.8 Degrees Celsius

जळगाव : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी (दि. २३) तापमानाने यंदाची उच्चांकी पातळी गाठली. सायंकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार शहराचा पारा तब्बल ४२.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला, त्यामुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

दुपारी रस्ते ओस पडले
सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत होती. दुपारी १२ नंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली आणि शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून आले. कमाल तापमान ४२.८ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होत असून उष्णतेचा चटका असह्य झाला आहे. किमान तापमानातही वाढ होऊन ते २६.२ अंशांवर स्थिरावल्याने रात्रीदेखील उकाडा कायम आहे.

आर्द्रता कमी, पण उष्णतेच्या झळा कायम
हवेतील आर्द्रता ४० टक्क्यांवर नोंदवली गेली आहे. आर्द्रता कमी असल्याने घामाचे प्रमाण कमी असले तरी कोरड्या उष्णतेचा त्रास अधिक जाणवत आहे. परिणामी दुचाकीस्वार आणि पादचारी यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आजची तापमानस्थिती :

  • कमाल तापमान : ४२.८°C

  • किमान तापमान : २६.२°C

  • आर्द्रता : ४०%

उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक शीतपेये व फळांच्या रसांकडे वळताना दिसत आहेत. दरम्यान, प्रशासनाने दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुढील २४ तासांतही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT