Jalgaon Crime | दुचाकी चोरट्यांचा ‘बाजार’ उठवला: भुसावळ पोलिसांची कारवाई; ७ महागड्या गाड्यांसह जामनेरची टोळी जेरबंद

जामनेर तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ७ महागड्या मोटारसायकली जप्त
Bhusawal Bike Theft Gang Busted
Bhusawal Bike Theft Gang BustedPudhari
Published on
Updated on

Bhusawal Bike Theft Gang Busted

जळगाव : भुसावळ शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा बाजारपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला. जामनेर तालुक्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ७ महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईची सुरुवात एप्रिल २०२३ मधील एका चोरीच्या गुन्ह्यापासून झाली. तापीनगर परिसरातील आशिष विनायक झोपे यांची होंडा शाईन (एमएच 19 डीजी 6722) ही दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार डी.बी. पथकाने सापळा रचून संशयित रविंद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले.

Bhusawal Bike Theft Gang Busted
Jalgaon Crime | महाजन खूनप्रकरण: धावत्या रेल्वेतच आरोपी जेरबंद; २४ तासांत छडा

चौकशीदरम्यान रविंद्रने आपला साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. कोळीवाडा, नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी गजाननलाही अटक केली. दोघांकडून कसून चौकशी केली असता, त्यांनी भुसावळ, जामनेर, जळगाव एमआयडीसी तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा परिसरातूनही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी आरोपींकडून होंडा शाईन, बजाज पल्सर (१२५, १३५, १५०), सुझुकी बर्गमनसह एकूण ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्यांची एकूण किंमत सुमारे ४.६५ लाख रुपये आहे.

Bhusawal Bike Theft Gang Busted
Jalgaon Crime | जळगाव हादरले: हात स्कार्फने बांधून बेदम मारहाण: अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; आरोपी जेरबंद

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

दरम्यान, आरोपींना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news