जळगाव

जळगाव : हरिनामाचा जयघोषत आदिशक्ती मुक्ताबाई पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीला 

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत मंगळवार (दि.18) रोजी रवाना झाली आहे. एक हजार ते दीड हजार वारकरी पांडुरंगाच्या भेटीला मार्गस्थ झालेले आहेत. 315 वर्षांची वैभवशाली परंपरा राज्यातील सर्वच दिंड्यांपेक्षा जास्त अंतर म्हणजेच 600 कि.मी. अंतर व 25 मुक्काम असलेली ही एकमेव दिंडी असल्याने मुक्ताई दिंडीचे महत्त्व आहे.

सकाळीच संस्थानतर्फे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अभिषेक केला. तर जिल्ह्यातील ना. गिरीष महाजन आमदार चंद्रकांत पाटील, विनोद तरळ रवींद्र हरणे व अधिकारी यांच्या हस्ते पादुका पूजन करण्यात येऊन बऱ्हाणपूर जिल्ह्यातील नाचणखेडा या गावातून राजेश प्रकाश पाटील यांची बैलजोडी राथासाठी सारथी होऊन वारी पांडुरंगाच्या भेटीला रवाना झाली.

गेल्या ११ वर्षापासून राजेश प्रकाश पाटील यांच्या जोडीला हा मान मिळत आहे. विशेष म्हणजे या बैलजोडीची नाचणखेडा गावात मंगळवार (दि.18) रोजी सकाळी विधिवत पूजा करून सवाद्य मिरवणूक काढून मुक्ताईनगरला रवानगी करण्यात आली. राजेश पाटील पूर्ण वर्षभर या बैलजोडीचा उपयोग फक्त धार्मिक कार्य व मुक्ताई रथासाठीच करतात, करत असल्याचे राजेश प्रकाश पाटील यांनी सांगितले.

जुन्या मंदिरातील मुक्ताबाई यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून पादुका विधिवत पालखीत ठेवण्यात येतील. त्यानंतर भजनी मंडळ व वारकऱ्यांच्या अभंग गायनाने पालखी मार्गस्थ झाले.

पालखी मार्गस्थ झाल्यानंतर जुन्या प्रवर्तन चौकमार्गे नवीन गावातून पालखी नवीन मुक्ताई मंदिरात येईल. त्या ठिकाणी देखील पादुकांना मुक्ताई चरणी ठेवून विधिवत पूजा करून रथात ठेवल्यानंतर पालखी मलकापूर कडे रवाना झाली आहे.

9 नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका

श्री संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये आता मोठे बदल व परिवर्तन झालेले आहे. पूर्वी पालखी खांद्यावर घेऊन जात होते. त्यावेळेस पितळी पालखी व पादुका होत्या. नंतर बैलगाडीतून पादुका व रथ घेऊन जात होते. यावर्षी प्रथमच लोकसभागातून नऊ अंदाजे नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका पालखी सोहळा रथासोबत पंढरपूरला जाणार आहे. तसेच चोपदाराची काठी चांदीची असणार आहे. आता प्रत्येकाला आषाढी वारीचे वेध लागले आहे. मानाची व सन्मानाची पालखीला ३१५ वर्षाचा प्रदीर्घ काळ होत आहे. सहा जिल्ह्यातून पालखीचा प्रवास आहे. जुने मंदिर ते नवीन मंदिरापर्यंत प्रत्येकाने वारीत प्रस्थानाच्या वेळी सहभागी व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींद्र हरणे महाराज यांनी केलेले आहे.

शासनाकडून दोन कोटींचा निधी

पंढरपूर येथे आषाढी एकादशी वारीला जात असलेल्या मानाच्या सात पालखी सोहळ्याला राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यामध्ये निधीची तरतूद केलेली आहे. श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती मूळ मुक्ताई मंदिर कोथळी येथील मुक्ताई संस्थन तर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT