NMC | मनपाचा फतवा: धोकादायक वाडे, घरे रिकामी करा

पंचवटी : येथील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने नागरिक राहात असलेले धोकादायक वाडे. (छाया : गणेश बोडके)
पंचवटी : येथील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने नागरिक राहात असलेले धोकादायक वाडे. (छाया : गणेश बोडके)

[author title="पंचवटी : गणेश बोडके" image="http://"][/author]
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेने पंचवटीतील जवळपास २०३ धोकादायक घरांची पाहणी करीत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पूररेषेत असणाऱ्या ७१ घरमालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास अशा घरांच्या नळजोडण्या तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनपा पंचवटी प्रभारी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी दिली आहे.

परसराम पुरिया रोड
परसराम पुरिया रोड

दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक वाडे व घरे कोसळण्याच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर यंदाही धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने संबंधित घर व वाडे मालकांनी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी. जिथे दुरुस्ती शक्य नाही, अशी घरे तातडीने रिकामी करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

मालवीय चौक
मालवीय चौक

पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक व अतिधोकादायक घरांमध्ये राहात असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी पंचवटीतील मखमलाबाद, आडगाव, म्हसरूळ, नांदूर, मानूर तसेच पंचवटी गावठाण भागातील जवळपास २०३ धोकादायक घरांची पाहणी करत संबंधितांना तसेच पूररेषेतील ७१ घरमालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सुकेनकर लेन
सुकेनकर लेन

पावसाळ्यात दरवर्षी धोकादायक घरमालकांना नोटिसा बजावल्या जातात. धोकादायक घरांना जमीनदोस्त करावे किंवा दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र संबंधित मूळ घरमालक याकडे दुर्लक्ष करीत महापालिकेच्या नोटिसीला दाद देत नाहीत. यंदा महापालिकेच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये, यासाठी संबंधितांनी दखल न घेतल्यास महापालिका प्रशासन आठवडाभर वाट बघणार असून, त्यानंतर संबंधितांची नळजोडणी, वीजपुरवठा खंडित करून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.

नोटिसींचा फक्त फार्स, कारवाई शून्य

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी मनपाकडून धोकादायक घरे व वाड्यांना रिकामे करण्याबाबत अथवा दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात येतात. मात्र या नोटिसींच्या पुढे काहीही शासकीय प्रक्रिया होत नाही. गेली अनेक वर्षे याच पद्धतीने काम सुरू आहे. आता मात्र यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी धोकादायक घरे व वाडे मालकांशी समन्वय साधून काही तरी मध्य काढणे गरजेचे आहे. अन्यथा मनपाच्या या हलगर्जीपणामुळे निष्पाप व्यक्तींचा बळी जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news