जिल्ह्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला .  (Pudhari Photo)
जळगाव

Ganesh Visarjan | जळगावात ढोल ताशांच्या गजरात २ हजार ५९ गणेशमूर्तींचे विसर्जन

Jalgaon Ganeshotsav | जळगाव शहरात मिरवणूक मार्गावर ८६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Ganesh festival 2025

जळगाव : गेल्या दहा दिवसांपासून घरगुती तसेच मंडळांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाला आज, अनंत चतुर्थीनिमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशे, डीजे, लेझीम यांच्या तालावर जिल्हाभरात एकूण २०५९ गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

ज्या थाटामाटात श्री गणेशाचे आगमन झाले होते, त्याच उत्साहात विसर्जन मिरवणुका निघाल्या. जळगाव शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिकेच्या गणपतीची मिरवणूक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सहभागाने सुरू झाली. त्यांनी स्वतः ढोल वाजवून उत्सवात रंग भरला. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही ढोलाच्या तालावर नृत्य करत हजेरी लावली.

जळगाव शहरात विसर्जन मिरवणुकीसाठी ९ मचाणे उभारण्यात आले असून त्यावरून थेट लक्ष ठेवले जात आहे. शिवाय ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. कोड चौक, टॉवर चौक आणि भिलपुरा परिसरात ड्रोनच्या मदतीने देखरेख केली जात आहे. शहरातील विसर्जन तलावावर करण्यात येत असून, नगरपालिकेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने मूर्ती बोटीत ठेवून विसर्जन केले जात आहे.

भुसावळ येथेही दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशा, डीजे यांच्या गजरात महिलांनी लेझीमवर नृत्य करत उत्साहात सहभाग घेतला. तापी आणि पूर्णा नदीकाठावर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांना नदीपात्राजवळ प्रवेशबंदी घालण्यात आली असून, घरगुती विसर्जनासाठी मोटरसायकलवर आलेल्या नागरिकांना परवानगी दिली जाते. मात्र विसर्जनाची जबाबदारी नगरपालिकेच्या स्वयंसेवकांकडे आहे.

दरम्यान, मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन यावल तालुका परिसरातून वाघुर धरण, हातनूर धरण अशा ठिकाणी रात्री उशिरा करण्यात येणार असल्याचे समजते.

गणपती विसर्जन

सार्वजनिक = 1452

खाजगी. = 493

1 गाव. = 114

एकूण विसर्जन = 2059

1. मुक्ताई नगर=111

2. भुसावळ बाजारपेठ=103

3. MIDC= 88

4. भुसावळ शहर =76

5. जळगाव ता. =67

6. अमळनेर= 65

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT