

पुणे: शनिवारी 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी फक्त उत्तर महाराष्ट्राला मुसळधारेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. सोबतच मुंबई, पुणे शहरांसह उर्वरित भागांत मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण शनिवारी अधिक असणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. (Latest Pune News)
शनिवारी पालघर, नाशिक घाट, धुळे, नंदुरबार येथे मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे; तर रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक जिल्हा आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. रविवारपासून राज्यात पाऊस कमी होणार आहे. शनिवारी पुणे आणि मुंबई शहरात ‘यलो अलर्ट’ असून, अधूनमधून मोठ्या सरी येण्याचा अंदाज वर्तविला आहे