जळगाव : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास पंधरा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अविनाश सुरेश धनगर (वय 22) (रा. भावेर ता. शिरपूर जिल्हा धुळे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या अल्पवयीन मुलीचे आरोपी सुरेश धनगर याने अपहरण करुन तिला मध्यप्रदेशात नेले होते. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून आरोपीने अल्पवयीन मुली सोबत शरीरसंबंध निर्माण केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयातील पिडीता व आरोपी या दोघांना ओकारेश्वर मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासात तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन तपास अधिकारी स पो नि अजित सावळे यांनी आरोपीस अटक करुन सखोल तपास केला. परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या आधारे आरोपीविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर येथे दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्हयाची सुनावणी अमळनेर सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश पी.आर चौधरी यांच्या समक्ष झाली. सुनावणी पुर्ण होवून (दि. 06 ) रोजी आरोपी अविनाश सुरेश धनगर याच्याविरुध्द भा.दं.वि. कलम 363 कलमान्वये 5 वर्ष तसेच बालकांचे लैगींक अपराधापासुन सरक्षण कायदा 2012 चे 4 व 12 मध्ये 10 वर्ष अशी एकुण 15 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या गुन्हयाचा प्राथमिक तपास पोहेकॉ प्रदीप राजपुत यांनी केला असुन पुढील तपास स.पो.नि. अजित सावळे यांनी केला. या खटल्याचे न्यायालयीन कामकाज सरकारतर्फे सरकारी वकील राजेद्र बी. चौधरी यांनी पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ. नितिन कापडणे यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा :