Jalgaon Bank Election File Photo
जळगाव

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान; कुठे आणि किती वाजेपर्यंत मतदान? ३० केंद्रांची संपूर्ण यादी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आज थंडावला असून, उद्या रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon District Bank Election

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आज थंडावला असून, उद्या रविवार, २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या १२ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून, उर्वरित जागांसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ३० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

उद्या सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहील. या निवडणुकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण रिंगणात असल्याने या दोन्ही लढतींच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून जळगाव येथील महाबळ रोडवरील सैनिक कल्याण सभागृहात होणार आहे.

१. शिवसेना (शिंदे गट) – ६ जागा

मंत्री गुलाबराव पाटील (जळगाव)

आमदार चंद्रकांत सोनवणे (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग)

आमदार किशोर पाटील यांची सुपुत्र सुमित किशोर पाटील (पाचोरा)

आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील

माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील (पारोळा)

सोमसिंग खुमानसिंग पाटील (भडगाव)

२. भाजप – ४ जागा

मंत्री गिरीश महाजन (जामनेर)

रोहित दिलीप निकम (चोपडा)

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे (भुसावळ)

मधुकर रामचंद्र राणे (बोदवड)

३. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – २ जागा

माजी जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल संजय पवार (धरणगाव)

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील (अमळनेर)

तालुकानिहाय मतदान केंद्रे व मतदार संख्या

जळगाव (केंद्र क्र. १ व २): सुनिला गजाननराव देवकर प्रायमरी स्कूल, जिल्हा पेठ, जळगाव (मतदार: ६३ व ३२७)

भुसावळ (केंद्र क्र. ३ व ४): म्युनिसिपल हायस्कूल, जामनेर रोड, भुसावळ (मतदार: २७ व १२५)

यावल (केंद्र क्र. ५ व ६): जि. प. मराठी मुलांची शाळा क्र. १, सातोद रस्ता, यावल (मतदार: ४९ व ३१२)

रावेर (केंद्र क्र. ७ व ८): सौ. कमलाबाई एस. एस. अगरवाल गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, रावेर (मतदार: ६२ व २६७)

मुक्ताईनगर (केंद्र क्र. ९ व १०): जि. प. मराठी केंद्रशाळा बोईन नं. १, मुक्ताईनगर (मतदार: ३० व ४७)

बोदवड (केंद्र क्र. ११ व १२): जि. प. मराठी मुलींची शाळा नं. १, साखला कॉलनी, बोदवड (मतदार: ३८ व २८)

जामनेर (केंद्र क्र. १३ व १४): न्यू इंग्लिश स्कूल, पंचायत समिती जवळ, जामनेर (मतदार: ९४ व १३३)

पाचोरा (केंद्र क्र. १५ व १६): श्री. गो. से. हायस्कूल, गिर्ड रोड, कोर्टाजवळ, पाचोरा (मतदार: ७९ व १२२)

भडगाव (केंद्र क्र. १७ व १८): सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, भडगाव (मतदार: ४१ व १०२)

चाळीसगाव (केंद्र क्र. १९ व २०): हिरुभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय, कोर्टासमोर, चाळीसगाव (मतदार: ८१ व ११४)

पारोळा (केंद्र क्र. २१ व २२): एन. ई. एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोर्टाजवळ, पारोळा (मतदार: ६६ व १४३)

अमळनेर (केंद्र क्र. २३ व २४): जी. एस. हायस्कूल, बस स्टँड मागे, अमळनेर (मतदार: ९४ व १२४)

चोपडा (केंद्र क्र. २५ व २६): कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, शिरपूर रोड, चोपडा (मतदार: ६४ व १५२)

धरणगाव (केंद्र क्र. २७ व २८): जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा, बस स्टँड जवळ, धरणगाव (मतदार: ६० व ८६)

एरंडोल (केंद्र क्र. २९ व ३०): आर. टी. काबरे विद्यालय, धरणगाव चौफुलीजवळ, एरंडोल (मतदार: ३७ व ६९)

मतदानासाठी ओळखपत्र बंधनकारक

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार मतदानाच्या वेळी मतदारांना निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो असलेले पासबुक किंवा शासनाने मान्य केलेल्या १४ ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT