Kamothe Bike Theft Pudhari
जळगाव

Bike theft jalgaon | जळगावात दुचाकी चोरांचा उच्छाद

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत तीन मोटार सायकली चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चोरट्यांनी शहरातील गर्दीची ठिकाणे आणि निवासी वसाहतींमधून दुचाकींवर हात साफ केला असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी अजय किसन पवार (वय ३०, रा. खोटेनगर, जळगाव) यांनी आपली हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स क्रमांक एम एच 19 डी टी 0034 ही ४०हजार0 किमतीची मोटार सायकल शाहु महाराज हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली होती. २१ रोजी रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोराने ती चोरून नेली. याप्रकरणी पोहेकॉ विरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.

वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारपेठ परिसरात घडली. भरत भागवत सावळे (वय ३३, रा. बोहडी, ता. भुसावळ) यांची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स क्रमांक एम एच 19 डी बी 5219 ही २० हजार किमतीची काळ्या-निळ्या रंगाची दुचाकी १२ मे रोजी दुपारी १२.३० ते २.३० वाजेच्या सुमारास बाजारपेठेतून चोरीला गेली. याप्रकरणी २२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोहेकॉ नितीन डांबरे पुढील तपास करत आहेत.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दिपनगर कॉलनी येथे घडली. कुणाल कमलाकर येवलेकर (वय ३८) यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न एम एच एकोणावीस 15 डीबी 7591 १० हजार किमतीची काळ्या रंगाची दुचाकी बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये लावली होती. १६ मे ते १९ मे च्या दरम्यान चोरट्याने ती लांबवली. याप्रकरणी पोहेकॉ मनोज येऊलकर तपास करीत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT