Jalgaon Robbery | चालत्या बसमध्ये महिला मजुराची बॅग फाडून ३.४५ लाखांचा ऐवज लंपास; चोपड्यात पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला

छनेरा ते रावेर प्रवासात धाडसी चोरी; कष्टाची पुंजी चोरट्यांनी केली साफ
robbery case
robbery casePudhari
Published on
Updated on

जळगाव : मध्य प्रदेशातील छनेरा येथून रावेरकडे बसने प्रवास करणाऱ्या एका महिला मजुराची बॅग फाडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत १ लाख ४५ हजारांची रोकड आणि सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरती नंदलाल चव्हाण या महिला मजूर बसने प्रवास करत असताना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या बॅगेची चेन उघडून आत ब्लेडने बॅग फाडली आणि त्यातील रोकड व दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेली १ लाख ४० हजार रुपयांची रोकड, लाल रंगाच्या पाऊचमधील ५ हजार रुपये, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स तसेच महिलांची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे.

robbery case
Jalgaon MLC Election | विधान परिषद निवडणूक; जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू

ही घटना लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने सुरुवातीला भुसावळ येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून प्रकरण CCTNS प्रणालीद्वारे मूळ कार्यक्षेत्र असलेल्या रावेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे एस.टी. तसेच खासगी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅगा आणि मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळ्या सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. हातावर पोट असलेल्या एका गरीब महिला मजुराची आयुष्यभराची जमा पुंजी चोरीला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोर करीत आहेत.

robbery case
Jalgaon APMC Chairman | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी लक्ष्मण पाटील

चोपड्यात बंद घर फोडून पावणेतीन लाखांचे दागिने चोरीला

वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जळगाव : चोपडा शहरातील शिरपूर रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत तब्बल २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, सर्वोदय कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे चोपडा शहर पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये दोन तोळ्यांची सोन्याची चैन, दोन तोळ्यांचे शॉर्ट मंगळसूत्र पोत, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक ग्रॅमची सोन्याची नथ तसेच चांदीच्या पायातील पट्ट्यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत अंदाजे २ लाख ५७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

robbery case
jalgaon hatnur dam: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा घटला; केवळ ३०.८२ टक्केच शिल्लक

याप्रकरणी फिर्यादी हर्षल राजेंद्र खलाणे यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news