जळगाव

Jalgaon crime: नशिराबादमध्ये ३.५ किलो गांजासह दोघांना अटक; २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळा; बेकायदेशीर विक्री व बाळगण्याच्या आरोपावरून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : नशिराबाद येथील साती बाजार चौक परिसरात बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री व बाळगणूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांवर कारवाई केली. या कारवाईत ३.५ किलो गांजा आणि रोख रक्कम २ लाख ५७ हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश भारत बाटुंगे (वय ३१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि सुभाष सोमा मराठे (वय ६७, रा. नशिराबाद, साती बाजार चौक) यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. कारवाईदरम्यान पोलिसांनी ३.५ किलो गांजा तसेच २ लाख ५७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला. गांजाची बेकायदेशीर विक्री व बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई API योगिता नारखेडे, PSI प्रिया दातीर, ASI काझी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत** चंद्रकांत पाटील, प्रशांत विरणारे, अनिल देशमुख, गिरीश शिंदे, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बीडे आणि प्रवीण लोहार** यांनी सहभाग घेतला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील बेकायदेशीर अमली पदार्थांच्या व्यवहारावर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पथकाची धडक कामगिरी

सदर कारवाई एपीआय योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रिया दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, गिरीश शिंदे, प्रशांत वीरणारे तसेच पोलीस शिपाई भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, विठ्ठल मुंडे आणि प्रवीण लोहार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अटक करण्यात आलेले हे दोन तस्कर हा गांजा कोठून आणत होते आणि नशिराबाद व जळगाव परिसरात तो कोणाला विकणार होते, याबाबत पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT