जळगाव

Jalgaon crime : चोपड्यात LCBची धडक कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन जणांना अटक केली. या कारवाईत एक गावठी कट्टा , दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही इसम कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत आहेत. त्यानुसार एलसीबी व चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास हुंडाई ई ओ एन एमएच २० इ इ 6103 ही कार अडवून पंचांसमक्ष झडती घेतली असता, मागील सीटखाली एक गावठी कट्टा, त्यासोबत एक मॅगझिन आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. आरोपींकडून ओप्पो विवो रेडमी असे कपनीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक आरोपी ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (३९), रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव सचिन रोशन पवार (३४), रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर अनिल कचरे साळुंखे (३७), रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT