Crime News pudhari photo
जळगाव

Jalgaon Crime |पत्नी पाठोपाठ मुलगाही अंध; क्रूर पती, सासूने दोघांनाही विहिरीत ढकलले, साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Jalgaon Crime |पत्नी पाठोपाठ मुलगाही अंध; क्रूर पती, सासूने दोघांनाही विहिरीत ढकलले, साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. साडेतीन वर्षांच्या अंध मुलाला विहिरीत ढकलल्याचा आणि ७० टक्के अंध असलेल्या सुनेचाही खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तिचा १०० टक्के अंध पती आणि सासू यांच्याविरुद्ध यावल पोलिसांनी खुनाचा तसेच सुनेचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर धक्कादायक सत्य समोर आले.

फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७, रा. किनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सासू आशाबाई भागवत पाटील यांनी त्यांना आणि त्यांच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत ढकलले. या कृत्यात पती स्वप्निल भागवत पाटील याचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या फिर्यादीने कोणताही जबाब दिला नव्हता. मुलाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा सखोल चौकशी केली असता ही माहिती उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दोघेही दृष्टिहीन आहेत. डॉक्टरांनी गर्भधारणेदरम्यान होणारे अपत्यही दृष्टिहीन असू शकते, असे सांगितल्याने पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, फिर्यादीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT