चार आरोपींकडून दोन गावठी पिस्तूलसह 10 जिवंत काडतुस जप्त  Pudhari Photo
जळगाव

Jalgaon Crime | चार आरोपींकडून दोन गावठी पिस्तूलांसह 10 जिवंत काडतूस जप्त : सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यासमोर गुन्हा करण्याचा प्रयत्‍न

आरोंपींची पोलिसांकडून कसून चौकशी : चौघांना अटक, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गंदालाल मिल दुध फेडरेशन कडे जाणा-या रोडवर सुरेशदादा जैन यांचे बंगल्यासमोर गुन्हा करण्याच्या उददेशाने आलेल्‍या चौघांना अटक करण्यात आले आहे. त्‍यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, 10 जिवंत काडतुस व मॅगझिनसह बिना परवाना जप्त केले आहे.. शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की गेदालाल मिल दुध फेडरेशन कडे जाणा-या रोडवर सुरेशदादा जैन यांचे बंगल्यासमोर आरोपी युनुस उर्फ सददाम सलीम पटेल वय 33 वर्ष, रा. गेंदालाल मिल जळगाव, निजामोददीन शेख हुसेनोददीन शेख वय 31 वर्ष, रा. आझाद नगर जळगाव, शोएव अब्दुल सईद शेख वय 29 वर्ष, रा गेंदालाल मिल जळगाव, सौहिल शेख उर्फ दया सी आय डी युसुफ शेख वय 29 वर्ष, ग शाहू नगर जळगाव हे गुन्हा करण्याच्या उददेशाने फिरत आहे.

त्याठिकाणी एक कार दिसुन आल्याने तिला थांबविली असता . कार मध्ये चार इसम हे संशयीत रित्या मिळुन आल्याने . सुरवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविले असता त्यांनी गावठी पिस्टल व जिवंत काडतुस असल्याचे कबुली दिली. कारमध्ये 01 पिस्टल व 06 जिवंत राउंड तसेच 01 खाली मॅगझिन व मारुती सझकी कंपनीची कार क्र. एम.एच. 43 ए.आर 9678 असा एकूण 1,78,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हा त्यांच्या कडुन हस्तगत करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधोक्षक. अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी . नितीन गणापूरे, पोलीस निरीक्षक सागर शिपी यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पा स्टेच्या गुन्हे शोध पथक करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT