

जळगाव : भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक 53 जवळ दोन संशयितांसह गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस तसेच मोटरसायकल मोबाईल असे एकूण 1 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल वरणगाव पोलींसानी जप्त केला आहे.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील फुलगाव शिवरायातील नॅशनल अभिक्रमांक 53 खाली आरोपी चरण सिंग, ओखा चव्हाण ( राहणार चौंडी तालुका बऱ्हाणपूर) पंकज रतन सिंग चव्हाण (राहणार मोरझिरा तालुका, मुक्ताईनगर ) हे दोघे 40 हजार रुपयांच्या गावठी पिस्तूल सह 4 हजार रुपयाच्या दोन जिवंत काडतूस दोघे संशयित बाळगताना मिळून आले. त्यांच्याजवळ 55 हजार रुपयाची मोटरसायकल 15 हजार रुपयांचे प्रत्येकी दोन मोबाईल असे एकूण 1 लाख 29 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कृष्णा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बांभोरी येथील एसएसबीटी कॉलेजच्या मागे अवैध गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने याठिकाणी धाड टाकली. घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचे अवैध धंदा सुरु असल्याचे उघडकीस आले. पोलीसांच्या या धाडीत तब्बल ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान एचपी कंपनीच्या ५२ गॅसटाकी, भारत गॅसच्या ८ गॅसटाकी, इलेक्ट्रॉनिक मोटर, वजन काटा तसेच एक वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी संशयित आरोपी अनिल शंकर सोनवणे व मोईन शेख युनूस शेख यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार सुनील लोहार हे पुढील तपास करीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून यावल व चोपडा तालुक्यात सलग चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
यावल : गट क्रमांक ३७१ मधील बालाजी ॲग्रोवन व चिंतामणी इंडस्ट्रीज या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूकडून पत्रे वाकवून थेट आतमध्ये प्रवेश करत २६,४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे
चोपडा : नागलवाडी येथील छत्रपती ॲग्रो मॉल मधून संशयितांनी थेट काउंटरवरून ७२ हजार रुपये लंपास केले. गणेशवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुंचाळे गाव : अंगणात उभी असलेली किंमत सुमारे ३५ हजार रुपयाची टीव्हीएस स्टार मोटरसायकल (एमएच-१९ डीएच-१४४१) संशयितांनी लंपास केली आहे.
चोपडा शहर : शिवनेरी अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर उभी असलेली किंमत सुमारे ३५ हजार रुपयाची होंडा शाईन (एमएच-२८-७८९२) मोटरसायकल संशयितांनी चोरून नेली.
या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांनी स्थानिक पोलिसांना आव्हानच दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या ऍग्रो कंपनीच्या कार्यालयातून तब्बल ४५ लाख रुपये रोख रक्कम, हार्ड डिस्क व पेन ड्राईव्ह अज्ञात व्यक्तीने लंपास केली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्प संचालक राजेंद्रसिंग रामसिंग पाटील यांच्या कार्यालयातून संशयित आरोपी साईनाथ पंढरीनाथ चौधरी याने येथील एका काळ्या पिशवीत ठेवलेले ४५ लाख रुपये, १६ हजार रुपयांची हार्ड डिस्क व ३०० रुपयांचा पेन ड्राईव्ह चोरून नेला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मुडेकर हे पुढील तपास करीत आहेत.