Jalgaon Crime :  pudhari photo
जळगाव

Jalgaon Crime | जळगाव - बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेलगत एलसीबीची धाड; अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ पुरुष, १० महिलांना अटक

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली शिवारात पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Lcb Police Raid

जळगाव : बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली शिवारात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करत असल्याच्या आरोपावरून १३ पुरुष आणि १० महिलांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांपैकी सर्व महिला राजस्थानमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडसगाव-चिखली परिसरातील काही हॉटेलांच्या मागील शेतांमध्ये महिला आणि पुरुषांकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम ११० आणि ११७ अंतर्गत कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील अथवा असभ्य वर्तन करण्यास कलम ११० अंतर्गत मनाई असून, कलम ११७ मध्ये अशा प्रकारच्या कृत्यांसाठी दंड किंवा कारावासाची तरतूद आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, परस्पर संमतीने संबंध ठेवणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या प्रकरणात, मानवी तस्करी, सक्ती किंवा कुंटणखाना चालविल्याचे पुरावे नसल्यास संबंधित प्रकरणावर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायदा (PITA) लागू होत नाही. त्यामुळे या प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी कथित अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सीमावर्ती भागातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा अवैध प्रकारांवर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT