Jalgaon Bribe case  
जळगाव

Jalgaon Bribe case |मुक्ताईनगर तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराचा गोरखधंदा : अव्वल कारकून पैसे घेताना रंगेहात सापडला (पहा व्हिडीओ)

अव्वल कारकून कैलास पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये "संजय गांधी योजना" व इतर शासकीय कामांसाठी लागणाऱ्या एफिडेविटसाठी नागरिकांकडून अनधिकृतरीत्या पैसे घेतल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. अव्वल कारकून कैलास पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते एफिडेविटसाठी सही व शिक्क्याच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारताना दिसून येत आहेत.

स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण एकट्या कैलास पाटील यांचे मर्यादित नसून, संपूर्ण कार्यालयात खाजगी एजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमताने चालणाऱ्या अवैध आर्थिक व्यवहारांचे जाळे निर्माण झाले आहे. नागरिक स्वतः एफिडेविट करण्यासाठी जात नाहीत. त्यांच्या ऐवजी हे एजंट काम करतात आणि "साहेबांना पैसे द्यावे लागतात" अशी कारणे देत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात.

हे पैसे एजंटच अधिकारी किंवा लिपिकांना पोहोचवतात.

नायब तहसीलदार यांचा टेबल शेजारी असतानाही, त्यांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे या गंभीर प्रकरणावर स्थानिक तहसीलदार गिरीष वखारे यांच्या कडून माहीती घेतली असता. त्यांनी सांगितले की, तहसील कार्यालयाचे कर्मचारी कैलास पाटील यांच्याबद्दलची व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप मी बघितली या व्हिडिओ क्लिप ची पूर्णपणे खात्री करून पुढील निर्णय घेऊ असे प्रसारमाध्यमा समोर बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT