Financial fraud Jalgaon
जळगाव : येथे 36 लाख 39 हजार रुपयांच्या मुग डाळ खरेदीत फसवणुकीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
तर दुसऱ्या घटनेत जळगाव येथे जमीन अधिग्रहण व्यवसायात फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे. 53 लाख 40 हजार रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्षम उद्योगाचे मालक विनोदकुमार चंचलचंद्र जैन (वय 41, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी बालाजी ट्रेडर्सचे सूर्यकांत ऊर्फ राज संजय व्यास यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्यामार्फत किशोर पुरोहित (किशोर ट्रेडर्स), दीपक व्यास (आयुष ट्रेडर्स) आणि श्रीकांत पुरोहित (विष्णुकांत लक्ष्मीनारायण) यांच्यासाठी 36 लाख 39 हजार 650 रुपयांची मुग डाळ खरेदी केली. मात्र, खरेदी केल्यानंतर देयक देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
या प्रकरणी सूर्यकांत ऊर्फ राज संजय व्यास, किशोर मिठालाल पुरोहित, श्रीकांत विष्णुकांत पुरोहित आणि दीपक राजेश व्यास यांच्या विरोधात IPC कलम 406, 420, 120 (ब), 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने 10 सप्टेंबर रोजी रात्री आरोपी किशोर पुरोहित व दीपक व्यास यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील व API गणेश फड, रातीलाल पवार आणि निलेश सूर्यवंशी करत आहेत.
जळगाव येथे जमीन अधिग्रहण व्यवसायात फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे. 53 लाख 40 हजार रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी गोपाळ प्रभूलाल राठी यांना आरोपी विजय जगदीश मंडोरा (वय 45) आणि लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरा (वय 47), पिंपराळा, जळगाव यांनी त्यांच्या जमीन अधिग्रहण व्यवसायातून फायदा मिळवून देण्याचे भासवून, पाच ते सहा पट परतावा देण्याचे सांगून बँक खाते तसेच रोख रकमेच्या स्वरूपात 53 लाख 40 हजार रुपये घेतले.
पैसे परत न देण्यामुळे गोपाळ राठी यांनी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. यावर आधारित गुन्हा नोंद करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आरोपी विजय जगदीश मंडोरा व लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरा यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API ईश्वर पाटील, समाधान पाटील आणि पोलिस कर्मचारी काझी करत आहेत.