Padmalay Ganpati Mandir : जळगाव जिल्ह्यातील अद्वितीय दोनमुखी पद्मालय गणपती मंदिर

दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती असलेले पद्मालय गणपती मंदिर
श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
पद्मालय गणपती मंदिरात एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या सोंडेचे असे दोन मुखी गणपती विराजमान आहेत.Pudhari News Network
Published on
Updated on

Padmalaya Ganpati Temple with two Swayambhu two Ganesha idols

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव) : नरेंद्र पाटील

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळील पद्मालय गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि प्रसिध्द गणेशस्थान आहे. याला सातपुडा पर्वतातील तपोभूमी, सप्तशृंगी गणपती किंवा दोनमुखी गणपती म्हणूनही ओळखले जाते.

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
पदमालय मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. Pudhari News Network

दोनमुखी गणपतीचे वैशिष्ट्य असे...

  • येथील गणेशमूर्ती ही जगातील एकमेव दोनमुखी स्वयंभू मूर्ती आहेत.

  • एक मुख सिद्धीचे तर दुसरे बुद्धीचे प्रतीक मानले जाते. एकाच ठिकाणी उजव्या आणि डाव्या याप्रकारे दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, गणपती मंदरापैकी हे एकमेव असे मंदिर आहे.

  • मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरात विराजमान आहेत.

  • मंदिराच्या आवारात गणेशवृक्ष आहे, ज्याची पाने गणेशाच्या आकृतीसारखी दिसतात.

    पद्मालय गणपती मंदिर

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहेPudhari News Network

पौराणिक संदर्भ आणि आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कश्यप व कपिल ऋषींनी येथे तप केल्यावर गणेश प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते. तसेच महाभारतकालीन पांडवांनी अज्ञातवासात असताना येथे श्री गणेशाचे पूजन केले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या क्षेत्राचा उल्लेख मुद्गल गणेश पुराणातही आढळतो.

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
भीमाने बकासुराला लढाईत पराभूत केले. लढाई नंतर तहान भागवण्यासाठी त्याने जमिनीवर प्रहार केला आणि तहान भागवली. म्हणून या कुंडाला भीमकुंड असे म्हणतात.Pudhari News Network

सप्तकुंड व भीमकुंड

मंदिर परिसरात सप्तकुंड आहेत. त्यातील भीमकुंड पांडवांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आख्यायिकेनुसार, भीमाने गदेचा प्रहार करून हे कुंड निर्माण केले. येथे पांडव व बकासुर युध्द झाल्याची कथा लोकमान्य आहे. यात्रेकरू आजही या कुंडात स्नान करून त्यानंतरच गणपतीचे दर्शन घेतात.

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे मोठे जातेPudhari News Network

स्थापत्य व इतिहास असा...

  • मंदिरासमोर २५ फूट उंच दीपमाळ असून पूर्वी त्यात १०८ दिवे प्रज्वलित करत असे.

  • मंदिर उभारणीसाठी तब्बल नऊ वर्षे लागले असून १५० कारागीरांनी त्यासाठी आपले श्रम पणास लावले होते.

  • ऐतिहासिक असे धान्य दळण्यासाठी बनवलेले मोठे दगडी जाते आजही प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला पाहायला मिळेल.

श्री क्षेत्र पद्मालय (जळगाव)
गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आणि भाद्रपदातील उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी असते.Pudhari News Network

पद्मालय गणपतीला विद्या, बुद्धी व सिद्धी प्रदान करणारा देव असे मानले जाते. या ठिकाणी गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आणि भाद्रपदातील उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात येथूनही भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. पद्मालय गणपती व भीमकुंड यामुळे हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे नव्हे तर प्राचीन इतिहास व पौराणिक परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र मानले जात आहे.

मंदिराच्या दर्शनासाठी असे जा..

जळगाव एरंडोल पारोळा येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. एरंडोल येथून अनेक खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात. जळगाव, धरणगाव आणि म्हसावद येथून सर्वाधिक जवळ असणारे रेल्वे स्थानक आहेत. तसेच विमानाने येण्यासाठी जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळ जवळ आहेत. श्री क्षेत्र पद्मालय प्रसिद्ध देवस्थान मानले जाते, त्यामुळे चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी गर्दी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news