Ganja Seized LCB (Pudhari File Photo)
जळगाव

Ganja Seized | दोन लाख 90 हजाराचा गांजा आरोपी सहज जप्त

आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : भुसावळ शहरात मोटरसायकलवर गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा कर्मचाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात दोन लाख 90 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती मोटारसायकल वरून भुसावळ शहरात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळविली असता स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांचे पथक हॉटेल सुरुची समोरील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक इसम होन्डा शाईन मोटारसायकलवर संशयास्पदपणे येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला मोठ्या ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, मध्य प्रदेश) असे सांगितले त्याच्याकडून १० किलो २७५ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोटारसायकल आणि मोबाईल हॅंडसेट असा एकूण २ लाख ९० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT