Eknath Sinde
जळगाव : लाडक्या बहिणींसाठीची आर्थिक तरतूद आहे ते सरकारने केलेली आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या पैशाची तरतूद केलेली आहे .त्यामुळे लाडकी बहीण योजना कुठेही अडचणीत येणार नाही. लाडक्या बहिणींमुळे सरकारही कुठे अडचणीत येणार नाही असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संतांच्या लाडक्या बहिणीच्या मुक्ताईच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे. तिथल्या वारकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव मुक्ताईनगरच्या वारकऱ्यांना देखील शुभेच्छा दिल्या.
माझ्या मनात एकच आहे मी पांडुरंगाला साकडं घालतो. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे.चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजाला सुखी होऊ अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे.
मुक्ताई पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षावाल्या लाडक्या बहिणीच्या रिक्षातून प्रवास केला. त्यांच्याबरोबर गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा रिक्षाचा प्रवास केला.
जळगाव विमानतळावर पिंक रिक्षावाल्या रंजना सपकाळे या लाडक्या बहिणीच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदे यांनी रिक्षात बसून प्रवास केला .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रिक्षामध्ये मंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा सोबत बसले. एकनाथ शिंदे माझ्या रिक्षात बसले हे मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत आहे मला खूप आनंदी वाटत आहे. मी त्यांना बिग ब्रदर म्हणते त्यामुळे माझ्या रिक्षात मी त्यांचं बिग ब्रदर म्हणून पोस्टर लावणार आहे अशी सुद्धा रंजना सपकाळे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्यासारखा भाऊ आपल्याला कधीच भेटणार नाही की जो आपल्याला प्रत्येक महिन्यात दिवाळी देतो या शब्दात रंजना सपकाळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.