जळगाव, पुढारी वृत्तसेवा : बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी १ रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा आज (दि,१६) दाखल केला आहे. Eknath Khadse
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, खडसे यांनी अॅड. अरूण देवरे व अॅड. सूर्यवंशी यांच्या मदतीने न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाजन यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी एक रुपयाचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. Eknath Khadse
याबाबत पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, वारंवार माझ्याविषयी खोटे नाते विधान करून मला छेडण्याचा व बदनामी करण्याचा त्रास देण्याचा प्रयत्न महाजन यांनी केला आहे. त्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे. माझ्या आजारपणावर सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. कोर्टाच्या कारवाई पासून वाचण्यासाठी आजारपणाचे सोंग आणण्याचा आरोप केला. माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी महाजन यांनी शंका उपस्थित केल्या. महाजन श्रीमंत माणूस आहे, मोठ्या नुकसान भरपाईचा खटला दाखल केला असता, तर ते भरू शकले असते. पण माझ्या दृष्टीने त्यांची एक रुपयाची किंमत आहे, असे खडसे म्हणाले.
हेही वाचा