Maharashtra Politics : शिंदे आता स्टॅन्डबाय मुख्यमंत्री; एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल | पुढारी

Maharashtra Politics : शिंदे आता स्टॅन्डबाय मुख्यमंत्री; एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला पूर्ण बहुमत असतानाही अजित पवार यांना सत्तेत घेण्याची गरजच नव्हती. मात्र, त्यामध्ये अजित पवार सामील झाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्व कमी झाले आहे. भाजपला आता त्यांची तेवढीशी गरज राहिलेली नाही. त्यामुळे शिंदे आता स्टॅन्डबाय मुख्यमंत्री बनले आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

मी भाजपचा 40 वर्षे विस्तार केला, तरी हा पक्ष माझा झाला नाही. तुम्ही तर आज या पक्षात गेला आहात. जो माझा झाला नाही, तो पक्ष तुमचा काय होणार, असा सवाल खडसेंनी अजित पवारांना केला. राष्ट्रवादीतील नेते ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’च्या भीतीने सरकारमध्ये सामील झाले नाहीत, तर सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी हा निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली.

Back to top button