जळगाव- जिल्हयात होळी, धुळवड हे सण दरवर्षी मोठया उत्सवात साजरे केले जातात. सण साजरी करतांना कायद्याचे, नियमांचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
होळी सण साजरा करत असतांना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना गैरवर्तन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सण साजरे करत असतांना कोणाशी गैरवर्तन होणार नाही. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही सण साजरा करत असतांना महिला, मुली, बालक यांचा अनादर होणार नाही, त्यांना चुकीच्यारीत्या स्पर्श होणार नाही. त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावेळी कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह फोटो काढण्यात येवू नये, जर चुकून असे फोटो क्लिक करण्यात आले तर ते समाज माध्यमांवर प्रसारीत न करता तात्काळ डिलीट करण्यात यावेत. सर्वानी आपल्या परिवारासोबत मित्रांसोबत हर्ष आणि उल्हासात होळी खेळतांना मुलींचा, महिलांचा, बालकांचा सन्मान ठेवावा त्यांच्याशी चुकीची वर्तनुक, आक्षेपार्ह स्पर्श होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, महिला, मुली, बालक यांना सुरक्षित वातावरणात, आनंदात सण साजरा करता यावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तरी सर्वांनी मिळून आपली जबाबदारी पार पाडून उत्साहात होळी साजरी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
होळी व धुलीवंदन सणाचा आनंद घेत असतांना विविध रंगाची उधळण करतांना पाळीव प्राण्यांना त्याची ईजा होणार नाही याची काळजी सर्व नागरीकांनी घ्यावी. धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंग, केमिकल, रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर टाकू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाळीव प्राण्यांच्या अंगावर विशेषतः शहरी भागात पाळीव कुत्र्यावर रासानिक रंग टाकल्यामुळे त्यांना ईजा होवू शकते. जर त्यांच्या डोळयातुन पाणी येत असेल अथवा डोळे लाल झाले असतील तर तात्काळ डोळे स्वच्छगार पाण्याने धुवून घ्यावेत. तसेच तात्काळ पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्रि नंबर १९६२ वर संपर्क करावा. तरी सर्व नागरीकांनी रासायनिक रंग पाळीव प्राण्यांच्या अंगावर किंवा डोळयात टाकू नये अन्यथा त्यांच्यावर प्राणीक्लेश प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगांव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.