Online Fraud pudhari photo
जळगाव

Jalgaon Online Fraud | क्लासेसचे पैसे परत मिळवून देण्याचे आमिष; अमळनेरच्या महिलेची २२.७५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Amalner Cyber Crime

जळगाव : खासगी क्लासेससाठी भरलेली फी परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून अमळनेर येथील एका महिलेची तब्बल २२ लाख ७५ हजार १३७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर येथील गृहिणी ज्योती विनोद सोनार (वय ४१) यांच्याशी २९ ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२६ या कालावधीत आरोपी सचिन राठोड, शरद पवार, गणेश कुमार मीना, अनुज, प्रदीप कुमार मीना तसेच संबंधित मोबाईल क्रमांकांचा वापर करणाऱ्या अन्य अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला.

आरोपींनी खासगी क्लासेसची भरलेली रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खासगी क्लास संस्थेच्या नावाने बनावट लिंक पाठवून विविध कारणे सांगत वेळोवेळी ऑनलाइन रक्कम भरण्यास भाग पाडले.

सुरुवातीला १ लाख ९ हजार ५०० रुपये स्वीकारल्यानंतर परताव्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण २२ लाख ७५ हजार १३७ रुपये जमा करून घेतले. मात्र कोणताही परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी २३ जूनरोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (डी) अंतर्गत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT