Jalgao News Pudhari
जळगाव

Jalgaon News: शाळेत खेळताना अचानक जमिनीवर कोसळला, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; इतर विद्यार्थ्यांकडून मारहाणीचा आरोप

कुटुंबियांचा इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण झाल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

A ninth-grade student died after suddenly collapsing to the ground while playing.

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या वर्गातील विद्यार्थी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय 15 रा. कठोरा जि. बुलढाणा ह.मु. कासमवाडी, जळगाव ) याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 11 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पेश इंगळे हा विद्याथ आई वडील, बहीण आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी 11 जुलै रोजी सकाळी शाळेत आलेला होता. दुपारी तीन वाजता शाळेच्या जेवणाची सुट्टी झाली होती.

विद्यार्थ्यांसोबत खेळत असतात तो अचानक जमिनीवर कोसळला अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्‍याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कल्पेशच्या आई वडील आणि भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान कल्पेश याच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला. सकाळी गेला तेव्हा तो चांगला होता. दोन दिवसांपूवसुद्धा त्याचा वाद झाला होता, त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात यावे, चौकशी करावी व दोषींवर अटक करून कारवाई करावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेश याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

कल्पेश याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तर, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT