जळगाव

जळगाव : जिल्ह्यात मोटरसायकल चोरट्यांचा धुमाकूळ; दहा मोटरसायकली लंपास

दिनेश चोरगे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जळगाव शहर, चाळीसगाव जिल्हा पेठ जामनेर, चोपडा शहर एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या परिसरातून दोन लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरट्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या परिसरातून चोरट्यांनी मोटरसायकली चोरल्या आहेत. यात विविध ठिकाणावरून रितेश प्रमोद महाजन, गेंदालाल मिल, राजू गणपत चोरे (रा. शिवाजीनगर) धनाजी काळे (नगर प्लॉट जळगाव) मोहम्मद नूर मोहम्मद, संजय बाबुराव,  विनोद राठोड (रा.चाळीसगाव) रितेश वाणी (रा.जिल्हा पेठ ), जयेश प्रमोद विसपुते, जामनेर शेख, रियाज शेख , विजय देवसिंग मस्के (चोपडा शहर ), सिद्धार्थ सुशीलकुमार लुल्ला यांच्या मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT