जळगाव पुढारी वृत्तसेवा ; जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आगमन करीत कर्मचाऱ्यांना गुलाल लावून मिठाई भरून धूलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कामाच्या तणावात असलेल्या खाकीला काही काळ सुखद धुलिवंदनाचा आनंद लुटता आला.
होळी झाली की दुसऱ्या दिवशी विविध रंग उधळून धुलिवंदन खेळण्यात येते मात्र अशावेेळीही पोलिस मात्र नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असतात. आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे हे स्वतः जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. त्यांनी कर्मचाऱ्यांना गुलाल लावून मिठाई भरून धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नेहमीच कामाच्या तणावात असलेला पोलीस कर्मचारी काही वेळ का होईना धुलीवंदनाच्या आनंदात रंगून गेल्याचे पाहायला मिळाले.