उत्तर महाराष्ट्र

जळगाव : चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वीस वर्ष सश्रम कारावास

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मोहाडी रोडवर काटेरी झुडपात मोकळया जागी नेवून 4 वर्षाच्या मुलीवर
आरोपी राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी याने अत्याचार केला होता. याप्रकरणी काल न्यायालयाने आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबत 75 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली, हा दंड न भरल्यास
अडीच वर्षाची साधा कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडाच्या रक्कमेतून 70 हजार रुपये  पिडीतेस देण्यात यावे असे न्यायालयाने सुनावले आहे.

मोहाडी रोडवर असलेल्या काटेरी झुडपात 4 वर्षीय मुलीवर आरोपी राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी
याने अत्याचार केला होता. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयासमोर खटला चालला. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. यात 4 वर्षाची पिडीता, तिचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष, तपासी अंमलदार व डॉक्टर यांची साक्ष खुप महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम 461, 380 आणि बा.लै.अ.प्र.अधिनियम 2012 चे कलम 4 ब  दोषी धरुन 20 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व 75 हजाराचा दंड व दंड न भरल्यास अडीच वर्षाची साधा कारावासाची शिक्षा सुनावली दंडाच्या रक्कमेतील 70 हजार रुपये पीडितेला देण्याचे न्यायालयाने सुनावले आहे.

सविस्तर हकीकत,
दिनांक 17 ऑक्टोबर 2018 च्या ते 18 ऑक्टोबर 2018 च्या ३.३० वाजेच्या दरम्यान जळगांव शहरातील वाघ नगर भागात फिर्यादिच्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेड मध्ये व शेडजवळ मोहाडी गावाकडे जाणारे रोडचे डावे बाजूस असलेल्या काटेरी झुडपात मोकळया जागी आरोपी राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी, वय २२ वर्षे,  याने फिर्यादिची पिडीत मुलगी वय 04 वर्षे ही शेडमध्ये झोपलेली असतांन तिला झोपेतून उचलुन शेडबाहेर नेवून मोहाडी गावाकडेस जाणारे रोडचे डावे बाजूस असलेल्या काटेरी झुडपात मोकळया जागी नेवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत  अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली होती. 18 ऑक्टोबर 2018 रोजी जळगांव तालुका पोलीस स्टेशनला आरोपीविरुध्द  गु.र. क.१०९/२०१८, भा.द.वि. कलम ३७६एबी, ४६१, ३८० आणि बा.लै अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ नुसार तक्रार नोंदविली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT