रेल्वेने उडविल्याने मृत्यू www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात एसटी चालकाची रेल्वेखाली आत्महत्या

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : एका एसटी चालकाने शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

शिवाजीनगर अमरधाम समोर डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपूर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १०.३० च्या सुमारास ही घटना गँगमनच्या निर्दर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कार्यवाहिला सुरुवात झाली.

रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी मृतदेहाचे खिसे तपासले असता एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख सुसाईट नोट मध्ये त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्येमुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT