उत्तर महाराष्ट्र

जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकची मतमोजणी आज सोमवार, दि.11 सुरू झाली आहे. काही जागांचा निकाल समोर आला असून, संपूर्ण निकालानंतर लवकरच येथे कुणाची सरशी होणार हे कळणार आहे. यात आजवर सहकारमध्ये प्रवेश न केलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दुध संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करत सहकारात दिमाखदार प्रवेश केला आहे.

ना. गुलाबराव पाटील यांची राजकीय कारकिर्द ही पंचायत समिती सदस्यापासून सुरू झाली होती. यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. त्यांना सभापतीपदाची देखील संधी मिळाली. यानंतर ते आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री बनले. या वाटचालीत त्यांनी कधीही जिल्हा बँक वा अन्य सहकारी संस्थांची निवडणूक लढविली नाही. यंदा मात्र त्यांनी दुध संघाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी जळगाव सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या समोर महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांनी अर्ज दाखल केला होता.

विजयी उमेदवार  असे…
दरम्यान, रविवारी, दि.11 सकाळी झालेल्या मतमोजणीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे 259 इतकी मते मिळवून विजयी झाले. भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एससी संवर्गातून तर एनटी संवर्गातून अरविंद भगवान देशमुख यांनी विजय संपादन केला आहे. दोघं विजयी उमेदवार शेतकरी विकास पॅनलचे होते. सहकार पॅनलकडून ओबीसी मतदारसंघात पराग वसंतराव मोरे यांनी ३१ मतांनी विजय मिळवला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया गुलाबराव देवकर या विजयी झाल्या आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT