उत्तर महाराष्ट्र

जळगाव : निलंबित निरीक्षक बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाविषयी अत्यंत घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करून बडतर्फ करावे. तसेच या प्रकरणातील संशयीत सहायक फौजदार अशोक महाजन यांच्यावर अटकेची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार (दि. 30) मराठा समाजबांधवांनी विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मराठा समाज बांधवांच्या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सभा घेत त्याची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा आत्मसन्मान अभियानाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, बकाले आणि अशोक महाजन यांच्या संवादाची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्यानंतर बकाले आणि महाजन यांना केवळ निलंबित करण्यात आले. तसेच जळगावच्या पोलिस अधीक्षकांनी बकाले आणि अशोक महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना संरक्षण देऊन नाशिकला जाण्यासाठी मदत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला.

जामीन फेटाळल्याने अटक करा…
न्यायालयाने जामीन फेटाळून पाच दिवस झालेले असतांनाही बकाले यांना अटक झालेली नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करत कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अशोक शिंदे, शिंदखेड राजा येथील जाधवराव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव, भास्कर काळे, गणेश पवार, संजीव भोर, किरण बोरसे, आनंद मराठे, संजय कापसे, महेश पाटील, उदय पाटील यांच्यासह हजारो मराठा समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT