जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आज दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांसह शेत मजुरांची धांदल उडाली, गुरा-ढोरांना याचा चांगलाच फटका बसला.
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा (तवा) परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदलाव घडून येत गारपीट झाली. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या नुसार तीन-चार दिवस धोक्याचे असल्याने सर्वांना सावध केले. त्याचा फटका जिल्ह्यात सर्वप्रथम जामनेर तालुक्याला आज बसला. दुपारची वेळ असल्याने सर्व शेतकरी मजुर आपापल्या शेती कामात व्यस्त होते. दुपारची वेळ व सर्वच घराबाहेर असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसला. नुकसानीची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा :