उत्तर महाराष्ट्र

जळगाव: सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे गोंधळ जागरण आंदोलन

अंजली राऊत

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

शेतकर्‍याच्या कापसाला भाव मिळत नाही. अजूनही शेतकर्‍यांच्या घरात ३० ते ३५ टक्के घरातच कापूस पडून आहे. कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल १२ हजारांसह शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार (दि.15) जागरण गोंधळ करण्यात आला व तृयीयपंथींच्या शब्दांत या सरकारचा धिक्कार व जाहीर निषेध नोंदवण्यात आला. कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या कापसाबाबत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र पाटील व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी पाटील यांनी जागरण गोंधळ पूजन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांनी जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला.

यांची होती उपस्थिती…

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक सचिव प्रा. डॉ. सुनिल नेवे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, रावेर बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील, जळगाव बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, संचालक अरूण पाटील, गट प्रमुख लक्ष्मण सपकाळे, युवकचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत चौधरी, चेतन पाटील, जिवन बोरनारे, राष्ट्रवादी युवकचे यावल तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, विनोद पाटील, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, भुसावळ युवक शहराध्यक्ष रणजित चावरिया, कार्याध्यक्ष विशाल ठोके, सिद्धार्थ सपकाळे, विजय भंगाळे, मिलींद उंबरकर आदी मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT