प्रातिनिधिक फोटो 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : शौचालय योजनेत दीड कोटींचा भ्रष्टाचार ; दोघांविरुध्द गुन्हा

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यातील रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान १ कोटी ५२ लाख ६४ हजार रूपयांचा भ्रष्ट्राचार केला म्हणून रावेर पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

"स्वच्छ भारत मिशन" ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांशी योजना असून गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार वैयक्तिक शौचालयाच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून बारा हजार रुपये देते. याच योजनेत मोठा भ्रष्ट्राचार झाला आहे.

यामध्ये गट समन्वय समाधान निंभोरे यांनी ओळखीच्या लोकांच्या खात्यावर स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावरुन १ कोटी ५१ लाख ६१ हजार ५३३ वर्ग केल्याचा आरोप आहे. तसेच स्वत:च्या खात्यावर १२ हजार प्रमाणे ३३ वेळा ६ लाख ४ हजार ४७७ रुपये वर्ग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच समूह समन्वयक मंजुश्री पवार यांनी१२ हजार रुपये प्रमाणे ३५ ओळखीच्या लाभार्थीच्या नावे ४ लाख २० हजार वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बीडीओ यांच्या खोट्या स्वाक्ष-यांच्या याद्या बँकेला दिल्या आहे.

या प्रकरणी (दि. २०) पंचायत समिती येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल चौधरी यांच्या फिर्यादी वरुन समाधान निंभोरे व मंजुश्री पवार यांच्याविरुध्द रावेर पोलीस स्टेशनला कलम ४०६, ४२०, ४०९, ४६५, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक  करीत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT