उत्तर महाराष्ट्र

जळगाव : राष्ट्रवादीकडून ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सतत वाढणारी महागाई… इंधन दरवाढ… वाढती बेरोजगारी… 'अच्छे दिन'च्या नावाखाली जनतेला आलेले 'बुरे दिन' यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.1) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्त्वाखाली 'एप्रिल फूल डे' चे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आजचा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून ओळखला जातो. एकमेकांची चेष्टा-मस्करी करून मजेत हा दिवस साजरा केला जातो. पण भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचीच मोठी फसवणूक झाली आहे. गेल्या सात वर्षात अनेक खोटी आश्‍वासने मोदी सरकारने दिली. त्यातील एकही आश्‍वासन प्रत्यक्षात आले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आले.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळेस मोदी तेरे राज मे, अगाया कटोरा हाथ मे.., काय दिलं ८ वर्षात एप्रिल फुल.. एप्रिल फुल…,युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे…, महागाई कमी करावी… अशा विविध घोषणा देण्यात आल्या. तसेच जोकर बोलाऊन त्याच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळेस महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, राजू मोरे, इब्राहिम तडवी, भगवान सोनवणे, किरण राजपूत, सहील पटेल, चंदन कोळी, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, सचिन साळुंखे, योगेश साळी, रितेश महाजन, हितेश जावळे, भुमेश निंबाळकर, रहीम तडवी, आकाश हिरवाडे, योगेश कदम, भाला तडवी, राहुल टोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT